Thursday, 9 March 2017

Formative Summative Evaluation

सातत्यपूर्ण सर्वंकष शैक्षणिक मूल्यमापन

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रक्रिया – 

अ) आकारिक मूल्यमापन (Formative Evaluation) – 

              विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व आकार घेत असतांना नियमित करण्याचे मूल्यमापन म्हणजे आकारिक मूल्यमापन होय. या मूल्यमापनात पुढील साधनतंत्रे उपयोगात आणून वर्गपातळीवर प्रत्येक विद्यार्थ्याच्या नोंदी ठेवणे अपेक्षित आहे.
  1. दैनंदिन निरीक्षण
  2. तोंडी काम (प्रश्नोत्तरे, प्रकटवाचन, भाषण संभाषण, भूमिकाभिनय, मुलाखत, गटचर्चा इत्यादी)
  3. प्रात्यक्षिक / प्रयोग
  4. उपक्रम / कृती (वैयक्तिक, गटांत, स्वयंअध्ययनाद्वारे)
  5. प्रकल्प
  6. चाचणी – (वेळापत्रक जाहीर न करता अनौपचारीक स्वरुपात घ्यावयाची छोट्या कालावधीची लेखी चाचणी / पुस्तकासह चाचणी (Open book test))
  7. स्वाध्याय / वर्गकार्य
  8. इतर – (प्रश्नावली, सहाध्यायी मूल्यमापन, स्वयंमूल्यमापन, गटकार्य अशा प्रकारची अन्य साधने.)
             वरील साधन तंत्रापैकी इयत्ता, विषय व उद्दिष्टे विचारात घेवून अधिकाधिक साधन तंत्राचा वापर करावा.

            मूल्यमापन करतांना किमान पाच साधनतंत्राचा वापर करावा, तर कला व संगीत, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व आरोग्य या विषयासाठी दैनंदिन निरीक्षण, प्रात्यक्षिक व उपक्रम/कृती या तीन साधनतंत्राचा वापर करावा. तसेच विद्यार्थ्यांना वर्षभरात किमान एक प्रकल्प व प्रत्येक सत्रात किमान एक छोट्या कालावधीची लेखी चाचणी / पुस्तकांसह लेखी चाचणी (Open book test) घेणे अपेक्षित आहे.
ब) संकलित मूल्यमापन (Summative Evaluation)-

             संकलित मूल्यमापन म्हणजे ठरावीक कालावधीनंतर एकत्रित स्वरुपाचे करावयाचे मूल्यमापन-लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक प्रश्नांचा समावेश असणारे प्रथम सत्राच्या अखेरीस पहिले व सत्राच्या अखेरीस दुसरे संकलित मूल्यमापन करायचे आहे.

प्रत्येक सत्रासाठी व विषयासाठी (कला व संगीत, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण व आरोग्य हे विषय वगळावे.)
इयत्ताआकारिक मूल्यमापनसंकलित मूल्यमापनएकूण


तोंडी+प्रात्य.लेखी
पहिली व दुसरी७० गुण१० गुण२० गुण१०० गुण
तिसरी व चौथी६० गुण१० गुण३० गुण१०० गुण
पाचवी व सहावी५० गुण१० गुण४० गुण१०० गुण
सातवी व आठवी४० गुण१० गुण५० गुण१०० गुण
टिप - 
         इयत्ता १ली व २री इंग्रजी विषयाचे संकलित मूल्यमापन तोंडी / प्रात्यक्षिक स्वरूपात करावे. 
(इंग्रजी माध्यमाव्यतिरिक्त शाळा)
         *** बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ कलम २९ नुसार

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रक्रिया निर्धारित करतांना पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.

अ) संविधानात असलेल्या मूल्यांशी अभिसंगत असणे.

ब) बालकांचा सर्वंकष विकास साधणे.

क) बालकांचे ज्ञान, क्षमता व विशेष बुद्धीमत्ता विकसित करणे.

ड) शारीरिक व बौद्धिक क्षमतांचा जास्तीत जास्त विकास करणे.

ई) बालसुलभ व बालकेंद्रित पद्धतीने उपक्रम, शोध व संशोधन या माध्यमांतून शिक्षण देणे.

फ) बालकाला भीती, दडपण व चिंता यापासून मुक्त ठेवणे आणि आपली मते मुक्तपणे व्यक्त करण्यास त्याला मदत करणे.

ग) बालकांच्या ज्ञान आकलनाचे व्यापक व अखंडपणे मूल्यमापन करणे आणि त्याकरिता त्याची योग्यता वाढविणे.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीमुळे काय साध्य होईल ?

  १. या पद्धतीमुळे अध्ययन सुरु असतानाच नियमितपणे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होईल.
  २. वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन, सकारात्मक शेरे यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्याची प्रेरणा मिळेल.
  ३. या मूल्यमापन पद्धतीच्या अवलंबामुळे शिक्षण प्रक्रिया कार्याशी, जीवनाशी जोडली जाण्यास मदत होईल.
  ४. अध्ययनाच्या वेळी मूल्यमापन आणि मूल्यमापनाच्या वेळी अध्ययन यासाठी मार्गदर्शन होणार असल्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता विकासास मोठ्या प्रमाणात प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळेल.
  ५. श्रेणी पद्धतीच्या अवलंबामुळे विद्यार्थ्या-विद्यार्थ्यांमधील प्रगतीची अनावश्यक तुलना कमी होईल आणि विद्यार्थ्याच्या प्रगतीची त्याच्या स्वतःच्या प्रगतीशी तुलना होत राहील.
  ६. पालकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत माहिती मिळेल.
  ७. विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या उल्लेखनीय बाबींचे सारांशरूपाने वर्णनात्मक चित्र प्रगतिपत्रकात नोंदविले जाईल. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत गुणांच्या विकासाला चालना मिळेल.
  ८. शिक्षकांच्या उपक्रमशीलतेला, प्रयोगशीलतेला आणि कल्पकतेला अधिक चालना मिळेल.
  ९. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे अनौपचारिक स्वरूपात होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांवरील दडपण कमी होऊन ती आनंददायी आणि ताणविरहित होण्यास मदत होईल.
  १०. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम त्या त्या वर्षी पूर्ण करून घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला त्याच वर्गात ठेवता येणार नाही. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही.
  ११. विद्यार्थ्यांचे सातत्याने मूल्यमापन होत असल्यामुळे शिक्षकांनाही वेळोवेळी आपल्या अध्यापनातील उणिवा लक्षात येऊन त्या वेळीच त्या वेळीच दूर करण्याची संधी मिळेल.
 

..:: Follow us on ::..

http://www.jamiaturraza.com/images/Facebook.jpg 

http://www.jamiaturraza.com/images/Twitter.jpg

0 comments:

Post a Comment